रविवार, जानेवारी 29, 2023

Chinchwad News: चिंचवड विधानसभा निवडणूक लढविण्यास शिवसेना इच्छुक – सचिन भोसले

एमपीसी न्यूज- 27 फेब्रुवारी रोजी चिंचवड विधानसभा निवडणूकीचे मतदान आहे. या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निवडणूक लढण्यास इच्छुक (Chinchwad News)असून तसा ठराव पक्षाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत  संमत करण्यात आला असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी प्रसिद्धीस दिली आहे. या बैठकीस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, उपजिल्हाप्रमुख, उपशहर प्रमुख, विधानसभा प्रमुख, महिला पदाधिकारी उपस्थित होते.
      चिंचवड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सहा नगरसेवक आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा सर्वधर्मिय मतदार या मतदारसंघात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त करून यापूर्वीच्या निवडणुकीत शिवसेनेने नगरसेवक निवडून दिलेले आहेत. पाच ज्येष्ठ पदाधिकारी ही निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. तसेच इतर पक्षातील इच्छुकांनी देखील संपर्क साधला आहे. त्यामुळे या चिंचवड विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार दिल्यास त्यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार या बैठकीत सर्वांनी
व्यक्त केला आहे. शिवसैनिकांची ही मागणी आपण संपर्क नेते आणि ज्येष्ठ नेत्यांपुढे मांडू असेही ॲड. सचिन भोसले यांनी सांगितले आहे.
Latest news
Related news