Chinchwad News : एल्प्रो सिटी मॉलमध्ये बॉईज 3 चित्रपटाचे चित्रीकरण

एमपीसी न्यूज – बॉईज, बॉईज -2 या मराठी चित्रपटांच्या भरघोस यशानंतर बॉईज 3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण देखील सुरू झाले आहे. चित्रपटातील काही भाग चिंचवड येथे एल्प्रो सिटी मॉलमध्ये चित्रीत केले जात आहेत.

तीन शालेय मित्रांच्या जीवनावर आधारित बॉईज -2 या चित्रपटाची कथा होती. बॉईज 3 चित्रपटाचे कथानक वेगळे असून, एका तरुणीवर आधारित हे कथानक असल्याची माहिती मिळतेय. या चित्रपटाचे चित्रीकरण आज (मंगळवार, दि.25) एल्प्रो सिटी मॉलमध्ये केले जात आहे. पार्थ भालेराव, सुमंत शिंदे, प्रतिक लाड हे अभिनेते चित्रीकरणासाठी उपस्थित आहेत.

दुपारी चार वाजता चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी चित्रीकरण पाहण्यासाठी गर्दी केलीय. यावेळी नागरिकांना कोरोना नियमांचा मात्र विसर पडल्याचे दिसून आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.