Chinchwad News : श्री गजानन बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध; अध्यक्षपदी योगेश बाबर यांची निवड

एमपीसी न्यूज : श्री गजानन लोकसेवा सहकारी बँकेच्या (Chinchwad News) सन 2023 – 2028 या कालावधीसाठी संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली. नियमाप्रमाणे 6 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्यातर्फे निवडणूक अधिकारी डॉ.शीतल पाटील, उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर-6 यांच्या निरीक्षणाखाली झालेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सभेत बँकेच्या अध्यक्षपदी योगेश मधुकर बाबर यांची व उपाध्यक्षपदी दिलीप जयवंतराव देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित संचालक श्रीमती गोरखे अनुराधा गणपत, वाणी रमेश शंकर, सावंत दिलीप भगवान, काळभोर अशोक विठ्ठलराव, इनामदार अतुल अशोक, बाबर अमित प्रकाश, बाबर धीरज गजानन, निकम अमोल आनंदराव, वाळके कृष्णा ज्ञानोबा, बोरूडे भास्कर वामन, थारेवाल धर्मेंद्र भास्कर, भांगडिया वंदना अनिल व जाधव वत्सला हिंदुराव उपस्थित होते.

श्री गजानन सहकारी बँक ही पिंपरी चिंचवड शहरातील अग्रगण्य सहकारी बँक असून 23 वर्षे जुनी बँक आहे. बँकेच्या दोन शाखा असून आर्थिक स्थिति उत्तम आहे.

बाबर हे गेली पंधरा वर्षे शहराच्या राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच बँकेचे ज्येष्ठ संचालक देशमुख हे गेली तीस वर्षे शहराच्या सामाजिक तसेच (Chinchwad News) वाहतूक क्षेत्रात कार्यरत आहेत.

नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश बाबर व नवनिर्वाचित उपाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी सर्व संचालक मंडळाचे आभार मानून पुढील काळात बँकेच्या प्रगतिसाठी कटिबद्ध राहू असे सांगितले.

Today’s Horoscope 08 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.