-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chinchwad News : शाहूनगरमधून दोन वाहनांचे सायलेन्सर चोरीला

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – इमारतीसमोर पार्क केलेल्या दोन गाड्यांचे सायलेन्सर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 21) सकाळी शाहूनगर चिंचवड येथे पुष्पक प्लाझा बिल्डिंग समोर उघडकीस आली.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

कैलास रामराव घुगे (वय 30, रा. पुष्पक प्लाझा, शाहूनगर, चिंचवड) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची इको कार (एम एच 14 / ई सी 5518) आणि त्यांच्या शेजारी राहणारे कुमार पेत्रस पारखे यांची इको कार (एम एच 14 / जी ए 9319) मंगळवारी रात्री त्यांच्या इमारतीसमोर पार्क केल्या होत्या. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दोन्ही कारचे वीस हजार रुपये किमतीचे सायलेन्सर चोरून नेले. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.