Chinchwad News : शहर परिसरात सहा वाहन चोऱ्या, दोन घरफोड्या

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर परिसरात सहा वाहनचो-या आणि दोन घरफोड्या झाल्या आहेत. याप्रकरणी पिंपरी, तळेगाव दाभाडे, भोसरी, एमआयडीसी भोसरी, चाकण, दिघी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 24) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पिंपरी येथे घरफोडी झाली. घराच्या दरवाज्याच्या चुंबकाला चावी लावून जेवणासाठी गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने चावी काढून घरात प्रवेश केला. घरातून दोन लॅपटॉप व मोबाईल, असा 92 हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 23) रात्री पावणेदहा ते अकरा या कालावधीत उद्यमनगर पिंपरी येथे घडली. याप्रकरणी ओमकार शिवाजीराव गवळी (वय 20, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तळेगाव दाभाडे येथे दुसरी घरफोडी झाली. दुकानाचे लोखंडी गेट उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातून सोन्याचे गंठण, सोन्याची अंगठी, रोख रक्कम व नळाचे वेगवेगळे भाग असा एकूण 70 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 23) रात्री नऊ ते सोमवारी (दि. 24) दुपारी साडेबारा या कालावधीत तळेगाव दाभाडे येथील शोभा हार्डवेअर या दुकानात घडली. किरण चंपकलाल ओसवाल (वय 34, रा. पंचवटी कॉलनी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रवींद्र उत्तम नरवडे (वय 32, रा. गव्हाणेवस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. नरवडे यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या घराच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

कृष्णा पांडुरंग जाधव (वय 52, रा. त्रिवेणी नगर, तळवडे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी जाधव यांची 18 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 19 जानेवारी रोजी टाटा मोटर्स पॅसेंजर डिस्पॅच गेट, टेल्को रोड, पिंपरी येथे घडली.

विठ्ठल ज्ञानेश्वर रौंदळ (वय 44, रा. पाईट, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पाईट गावातून चोरून नेली. ही घटना 24 जानेवारी रोजी पहाटे उघडकीस आली.

संजय बाळू बांगरे (वय 35, रा. निगडे, ता. मावळ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बांगरे यांची 70 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 20 जानेवारी रोजी घाटेवस्ती आंबेठाण येथे उघडकीस आली.

शरद तुकाराम शिंदे (वय 38, रा. सुदवडी, शिंदेवस्ती, ता. मावळ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शिंदे यांची 35 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी खेड तालुक्यातील खालुम्ब्रे येथील बडवे कंपनीच्या समोरील पार्किंगमधून चोरून नेली. ही घटना 20 जानेवारी रोजी घडली.

चंद्रकांत शंकर शेलार (वय 67, रा. विजयनगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेलार यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 18 जानेवारी रोजी माऊली नगर, दिघी येथे घडली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.