Chinchwad news: शिवतेजनगर येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान शिवतेजनगर आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी 163 दात्यांनी रक्तदान केले.

शिवतेजनगर येथे रविवार (दि. 11) झालेल्या शिबिराचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, नगरसेविका योगिता नागरगोजे लायन्स क्लबचे अध्यक्ष भीमसेन अग्रवाल, पूर्णानगर विकास समितीचे अध्यक्ष विकास गर्ग, हरिनारायण शेळके, अर्चना तौडकर, संतोष शेळके, मंगेश पाटील, अंजली देव, सारिका रिकामे, नीलिमा भंगाळे, अक्षदा देशपांडे, प्रीती झोपे, छाया सातपुते, मेघराज बागी, अशोक बंसल, नितीन गर्ग, नितीन जैन, रवींद्र सातपुते, अशोक अग्रवाल, नरेंद्र अग्रवाल, समीर मुल्ला, विनोद रोकडे, संभाजी बालघरे, श्रीकृष्ण काशीद आदी उपस्थित होते.

शिबिराला मोरया ब्लड बँक, आणि पी.एस.आय.ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले. ज्यांनी रक्तदान केले त्यांना सर्टिफिकेट, मास्क, सॅनिटायजर, आर्सेनिक अलबम 30, वाफ घेण्याचे यंत्र देण्यात आले.

सूत्रसंचालन सुप्रसिद्व निवेदक राजाराम सावंत यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.