Chinchwad News : दंत चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसीन्यूज : पुर्णानगर विकास समिती आणि इंटर्नल स्माईल डेंटल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या मोफत दंत चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन दिवसात सुमारे शंबर नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.

माजी महापौर मंगला कदम यांच्या हस्ते सोमवारी ( दि. 8 ) पुर्णानगर येथे या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पुर्णानगर विकास समितीचे संस्थापक विकास गर्ग, संभाजी बालघरे, नगरसेविका योगिता नागरगोजे, अर्चना तोउंडकर, राष्ट्रवादीच्या मनीषा गटकळ , विनोद रोकडे, बजरंग दलाचे गणेश भुजबळ, सुनील कदम, डॉ. शीतल सरडे-ढोले, डॉ. रेश्मा खेडेकर, डॉ. सिद्धांत सोनावणे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

आदी येत्या 14 मार्चपर्यंत हे शिबीर सुरु राहणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन विकास गर्ग यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.