Chinchwad News : आमदार जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसीन्यूज : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तनगर परिसरात राबविलेल्या मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वाटप शिबिराला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

आमदार जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त दत्त नगर परिसरात नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन महापौर माई ढोरे, उपमहापौर केशव घोळवे, भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे, सदाशिव खाडे, नगरसेवक तुषार हिंगे, भाजप सरचिटणीस राजू दुर्गे, भाजपा शहर उपाध्यक्ष सुप्रिया चांदगुडे, नगरसेविका शर्मिला बाबर, कमल घोलप यांच्या हस्ते करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

या प्रसंगी वायसीएम हॉस्पिटल व डॉ. डि. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्टर्सच्या पथकाने शिबिरात एकूण 627 जणांची तपासणी केली.

भाजपा पदाधिकारी विजय शीनकर, दीपाली करंजकर, रुपेश सुपे, वैदही जंजाळे, नंदा करे, अजित भालेराव, मोनाली यादव, संतोष रणसिंग, नेताजी शिंदे, यशवंत दनाने, मनोज कसबे, सोनटक्के, धनंजय जगताप, राकेश ठाकूर, जयश्री वाघमारे, धरम वाघमारे, बाबा इटकर, मिलिंद कांबळे, शेखर साळवे, सुनील शेलार, अविनाश वेताले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like