Chinchwad News: महिला आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – चिंचवड- पूर्णानगर येथील चुघ क्लिनिकच्या वतीने महिलांसाठी आयोजित मोफत आरोग्य शिबिरात विविध तपासण्या करण्यात आल्या. दोन दिवसीय या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

या शिबिरात प्रसूतीपूर्व सल्ला, स्त्रीरोगशास्त्र तपासणी आणि सल्ला, हिमोग्लोबीन, रक्तदाब, मासिक पाळीचे विकार, पाठदुखी, कंबरदुखी, केस गळतीच्या समस्या यावर सल्ला देत तपासण्या करण्यात आल्या. आरोग्य शिबिरात सहभागी शिबिरार्थी स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. सुरेंद्र चुघ, संगीता चुघ, अमेय चुघ, बिंदिया ची, नगरसेविका योगिता नागरगोजे, ज्ञानेश्वर नागरगोजे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.