Chinchwad News : संभाजीनगर परिसरात मोफत फुट पल्स थेरपी शिबिराला प्रारंभ

एमपीसीन्यूज : ‘पूर्णानगर विकास समिती’ यांच्या वतीने संभाजीनगर, कृष्णानगर, घरकुल वसाहत, अजंठानगर, महात्मा फुले नगर या परिसरात आजपासून मोफत फुट पल्स थेरपी शिबिराचा प्रारंभ करण्यात आला.

‘तारक मेहताका उलटा चष्माचे’ कलाकार कमल धिमिराय, श्रुती भट्टाचार्य, मोनिका वर्मा आदींच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराची सुरुवात करण्यात आली.

यावेळी विकास गर्ग, अशोक अगरवाल, शिवसेनेचे अनिल सोमवंशी, सचिन सानप, संभाजी बालघरे,  अप्पा सायकर, मनिषा गटकळ, यशवंत कण्हेरे, शैलेश मोरे,अजय जाधव, शिवानंद स्वामी आदी उपस्थित होते.

मारुती मंदिर-कृष्णानगर, श्री गणेश मंदिर-शिवतेजनगर, मनपा दवाखाना-घरकुल, श्री हनुमान मंदिर-कोयनानगर, शिवनेरी सोसायटी-अजंठानगर, रोज हाईट्स-पूर्णानगर या ठिकाणी पाच जानेवारीपर्यंत दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे शिबीर सुरु राहणार आहे.

कुठल्याही गोळ्या किंवा औषध न देता फुट पल्स थेरपी पद्धतीने आजारांवर मात करणारी म्हणजेच संजीवनी वेलनेस सेंटरच्या माध्यमातून ही उपचार पद्धत या शिबिरात वापरली जात आहे.

अचानक उद्भवणारे आजार, गंभीर आणि दीर्घकालीन आजार, सांधे दुखी ,नसा संबंधित कोणत्याही समस्या,  रक्तदाब, मधुमेह, स्नायू दुखणे/आखडणे, वजन कमी करणे आणि अर्धांगवायू आदी आजारांवर फुट पल्स थेरपीद्वारे मोफत उपचार केले जात आहेत.

या शिबिरात आतापर्यंत 300 हून अधिक नागरिकांनी उपस्थिती लावत डॉक्टरांना त्यांचे आजार सांगितले व इलाज करून घेतले आहेत.

सूत्रसंचालन शिवानंद चौगुले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.