Chinchwad News : राज्यस्तरीय गडकरी करंडक एकांकिका स्पर्धेला प्रारंभ

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद , पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने गडकरी करंडक एकांकिका स्पर्धेची गुरूवारपासून (दि.11) सुरुवात झाली. चिंचवडगावातील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सुरु झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एकूण आठ एकांकिका सादर करण्यात आल्या तर, दुस-या दिवशी (दि.12) दहा एकांकिका सादर झाल्या.

एकांकिका स्पर्धेचा शुभारंभ कलाकारांतर्फे दिप प्रज्वलन करुन करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कलापिनी नाट्य संस्था, तळेगाव व बी.एम.सी.सी. कॉलेज पुणे या संस्थेचे कलाकार संजय मालकर, अनुजा बोरसे, अक्षय सिधये उपस्थित होते.

पहिल्या दिवशी (गुरूवारी, दि.11) म्हाराज म्येले, कुणी तरी पहिलं हव, मजार, द डे ऑफ कन्फेक्शन, मरणोत्पात, नॉ एक्झॉक्टली बट सॉर्ट ऑफ, यंदा कर्तव्य आहे, जाळ्यातील खिळे या आठ एकांकिका सादर करण्यात आल्या.

आज (शुक्रवारी, दि.12) गिफ्ट, 12 किमी, एएसएल प्लीज, मळवट, मी डॉ. विनायक आंबेतकर, अरे अरे मना, युएसआय, पोस्टजवळील 5 वी गल्ली, जंगल जंगल बंटा चला है, अर्धविराम या एकांकिका सादर करण्यात आल्या.

शनिवारी दहा आणि रविवारी उर्वरित सहा एकांकिका सादर होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी पारितोषिक वितरण समारंभ होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.