Chinchwad News : पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा

एमपीसी न्यूज – पिंपरी विभागच्या कार्यक्षेत्रातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि. 06) वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रीय प्रशिक्षक शिवाजी कुचे यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार यांना ताण तणाव व्यवस्थापन कसे करावे हे प्रात्याक्षिक व संगीताद्वारे दाखवून दिले.

राष्ट्रीय प्रशिक्षक शिवाजी कुचे यांनी आंतराष्ट्रीय स्तरावरील अनुभव व प्रशिक्षण याची उपस्थितांना माहीती दिली. दैनंदिन व्यस्त जिवनशैली मध्ये कशा प्रकारे जिवन सुखकारक, तणावमुक्‍त होईल या विषयी मार्गदर्शन केले. तसेच सहभागी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कार्यशाळेविषयी मनोगत व्यक्त करत अयोजकांचे आभार मनाले.

पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केले सदर प्रशिक्षणाचा दैनंदीन जिवनात कसा उपयोग करायचा याविषयी सुचना केल्या. या कार्यशाळेसाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, निगडी पोलीस ठाण्यातील 25 अधिकारी व 110 कर्मचारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्‍त रामनाथ पोकळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त मंचर इप्पर, पिपरी विभाग सहायक पोलीस आयुक्त सागर कवडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वपोनि सुधाकर काटे यांनी केले. कार्यक्रमाचे समारोप सपोआ पिपरी विभाग सागर कवडे यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.