Chinchwad News : पोलीस उपनिरीक्षक शाकीर जिनेडी यांना राष्ट्रपती पदक जाहीर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकात (Anti-ransom squad of Pimpri chinchwad Crime Branch) कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक (Sub-Inspector of Police) शाकीर मोहम्मद गौसमोहम्मद जिनेडी (Shakir Jinnedy) यांना सन 2021 चे ‘राष्ट्रपती पदक’ (President’s Medal)  जाहीर झाले आहे.

जिनेडी हे 1987 मध्ये पोलीस दलात भरती झाले. आजवरच्या पोलीस सेवेत त्यांनी 100 पेक्षा अधिक अग्निशस्त्रे जप्त केली आहेत. कुठलाही पुरावा नसलेल्या पाच क्लिष्ट खून प्रकरणांचा ( Murder Case) त्यांनी छडा लावला आहे.

त्यांनी चेन स्नॅचिंग, जबरी चोरीचे 42 गुन्हे उघडकीस आणले. त्यात 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात त्यांनी मदत केली. घरफोडी चोरीचे 110 गुन्हे उघडकीस आणून त्यात एक कोटी 10 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात मदत केली.

सन 2012 साली पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीत एका लहान मुलाचे अपहरण झाले होते. या गुन्ह्याचा त्यांनी 48 तासाच्या आत छडा लावत एका महिलेला अटक केली. या कामगिरीबाबत त्यांना राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्यांकडून दहा हजारांचा पुरस्कार देण्यात आला.

सन 2020 मध्ये चाकण-शिक्रापूर रोडने एका कारमध्ये अंमली पदार्थ घेऊन जात असल्याची माहिती देखील उपनिरीक्षक जिनेडी यांनाच मिळाली होती. या प्रकरणात पुढे 20 कोटी 5 लाख 23 हजार 100 रुपयांचा 20 किलो मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थ जप्त केले.

जिनेडी यांना सुमारे 460 रिवॉर्ड प्राप्त झाले आहेत. त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल सन 2020 चे राष्ट्रपती पोलीस पदकही जाहीर करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.