Chinchwad News : ‘विषय बावीस’, समाजातील अपेक्षित बदलांवर प्रकाश टाकणारा आगळा-वेगळा ‘टॉक शो’

एमपीसी न्यूज – नावातच वेगळेपण असलेला आणि समाजातील अपेक्षित बदलांवर प्रकाश टाकणारा ‘विषय बावीस’ हा आगळा वेगळा वेगळा टॉक शो यु ट्यूब वर येऊ घातला आहे. या शोच्या माध्यमातून दुर्लेक्षित व गरजेच्या विषयांवर हलक्या फुलक्या विनोदातून लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

येत्या 22 डिसेंबरला याचा पहिला एपिसोड रिलीज होत आहे.

‘विषय बावीस’ ही सौरभ चव्हाण यांची संकल्पना असून त्यांनीच याचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. सौरभ चव्हाण आणि सागर चव्हाण हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

समाजात आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर कधीच बोललं गेलं नाहीये, पण समाजातील अपेक्षित बदलांसाठी त्या गोष्टी मांडणे काळाची गरज आहे. वेगवेगळे विषय घेऊन हलक्या-फुलक्या विनोदातून मूळ विषयाकडे जाणं असे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. असे सौरभ चव्हाण यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

पहिल्या सीझनमध्ये मॅनिपुलेशन (Manipulation), ट्रेन्ड (Trend), सॅाफ्ट टार्गेट (Soft Target), थिअरिज (Theories), आणि हिप्पोक्रसी (Hypocrisy) हे विषय हाताळले जाणार आहेत.

या विषयांवर जास्त माहिती उपलब्ध नाही तसेच, ते कधीच कुणी हाताळलेही नाहीत. नुकतंच ‘विषय बावीस’चे टायटल सॅान्ग प्रदर्शित झाले आहे. मंगळवार, 22 डिसेंबर रोजी या सिरिजचा पहिला एपिसोड प्रदर्शित केला जाणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी ‘विषय बावीस’ या चॅनलला भेट द्यावी असे आवाहन सौरभ चव्हाण यांनी केले आहे.

* चॅननला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.