Chinchwad News: ‘आदित्य बिर्ला’मध्ये लहान मुलीवर ‘पोस्ट कोविड’नंतरच्या आजारावर यशस्वी उपचार

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमधील बालरोग विशेषज्ञ डॉक्टरांनी लहान मुलीवर पोस्ट कोविड-एमआयएस-सी मल्टिपल ऑर्गन डिस्फ्युजनसंबंधीचे उपचार यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. रुग्णालयात दाखल झाल्यापासून 16 व्या दिवशी या लहान मुलीला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले.

आर्या (नाव बदलेलं आहे.) या 15 वर्षांच्या मुलीला एक आठवडाभर प्रचंड ताप, पोटदुखी आणि अशक्तपणा होता. ती आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी आली. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी एक दिवस आर्याला खूप धाप लागायला लागली आणि श्वास घेणं अवघड होऊन बसलं.

प्रचंड थकवा आला आणि तिचा रक्तादाबही खूप कमी झाला. बिर्ला हॉस्पिटलमध्ये अडमिट होण्याआधी तीन आठवडे आर्याला कोरोनाची लागण झाली होती आणि तिने 5 दिवस उपचार घेतले होते.

याबाबत आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे डॉ. विपुल गांधी म्हणाले, आम्ही तिला तपासल्यावर तिच्या शरीरात डेंग्युच्या आणि कोरोनाच्या दोन्ही अँटिबॉडीज पॉझिटिव्ह आल्या. ज्यामुळे पोस्ट कोविड एमआयएस-सी (post COVID MIS-C Multisystem inflammatory syndrome in children) होण्याची शक्यता जाणवली. या मुलीला आठवडाभर सणकून ताप आला होता. तिचे अनेक अवयव योग्य कार्य करत नव्हते.

त्याचबरोबर सेप्टिक हायोटेन्सिव्ह शॉक, श्वसनासाठी खूप त्रास होत होता. तिचे रक्त पातळ झाले होते. त्यामुळे रक्तस्राव होण्याची शक्यता खूप होती. तिच्या शरीराचे वाढलेले तापमान या सगळ्यामुळे आमचे निदान योग्य ठरले ,’ असे डॉ. विपुल गांधी यांनी सांगितलं.

‘ती हॉस्पिटलमध्ये आल्यापासून आम्ही औषधोपचार सुरू केले. दुसऱ्या दिवशी तिला श्वास घेणे मुश्किल झाले होते. तिला हायर प्रेशर रिक्वायरमेंटसह प्रोन पोजिशनिंग देण्यात आले.  हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटरी व्हेंटिलेशन (HFOV) हा फुफ्फुसांच्या बचावासाठीची उपचार आणि  एक्स्ट्राकॉर्पोरियल मेंब्रेन ऑक्सिजनेशन (ECMO) या दोन्ही उपचारांबद्दल रुग्णाला माहिती देण्यात आली.

ECMO मध्ये शरीरातील रक्त हार्ट-लंग मशीनच्या सहाय्याने पंप करून रक्तातील कार्बन डाय -ऑक्साईड वायू काढून ऑक्सिजनयुक्त रक्त शरीरात सोडलं जातं. हे सर्व समजवून सांगितले,’असे आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे पेडिअट्रिक इंटेसिव्हिस्ट डॉ. कौस्तुभ प्रभूदेसाई यांनी सांगितलं.

हळूहळू दाखल झाल्याच्या तिसऱ्या दिवशी मुलीने प्रोन पोजिशनिंगला आणि फिजिओथेरेपीला चांगला प्रतिसाद दिला. तीव्र ताप नियंत्रणात आणण्यासाठी आयव्हीआयजी इन्फ्युजन सुरू करण्यात आले. तिच्या शरीरात उजव्या बाजूला झालेले न्युमोथोरॅक्स चेस्ट ड्रेन वापरून स्वच्छ करण्यात आले.

आयडी स्पेशलिस्ट डॉ. रामन गायकवाड यांनी आयव्हीआयजी डोस आणि एसओएस औषधोपचार सुरू ठेवण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला. पाचव्या दिवशी तिचा तीव्र ताप आणि उष्णतेने आयव्हीआयजीला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. आर्यानी या वर सांगितलेल्या सर्व उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आणि सातव्या दिवशी एक्सट्युबेशन केले तेही तिने सहन केले.

हळूहळू तिचे स्टिरॉइड्स कमी केली गेली. उष्णताही कमी झाली. आयसीडी काढण्यात आले आणि दाखल झाल्यापासून 16 व्या दिवशी आर्याला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले.

‘आर्याची मेडिकल कंडिशन ही खूप दुर्मिळ आणि गंभीर होती. पोस्ट कोविड-19 एमआयएस-सी (Multisystem inflammatory syndrome in children) हा कोविड-19 आजार होऊन गेलेल्या व्यक्तीला होणारा गंभीर आजार आहे. कोविड-19 ची लागण होण्याची शक्यता असलेल्या इतर नागरिकांसोबतच लहान मुलांनाही लसीकरण करण्याची किती गरज आहे हे या आर्याच्या उदाहरणावरून लक्षात येते,’ असे आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या सीईओ रेखा दुबे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.