Chinchwad News :  मोहननगरमध्ये श्वानांचा संशयास्पद मृत्यू, चौकशी करण्याची प्राणीमित्रांची मागणी 

एमपीसी न्यूज – मोहननगर परिसरात श्वानांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. आज (दि.19) सकाळी फिरायला बाहेर पडलेल्या नागरिकांना श्वानाची दोन पिल्ले मरुन पडल्याचे दिसून आले. खाण्यातून त्यांना विष दिल्याची शंका प्राणीमित्रांनी वर्तवली असून, चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

प्राणी मित्र सूरज कावळे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी दत्ता वाघमोडे, सूरज मिरगे, आश्रय मानूरकर यांनी मोहननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस अधिका-यांनी घडलेल्या प्रकारची पाहणी करून मृत श्वानांचे मृतदेह शव विच्छेदन अहवाल तयार करायला पाठवले आहेत.

श्वानांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने प्राणीमित्र आणि परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत आहेत. अज्ञात व्यक्तीने खाण्यातून त्यांना विष दिल्याची शंका प्राणीमित्रांनी व्यक्त केली असून, चौकशीची मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.