chinchwad News : वीज बिल उशीरा देणा-या ठेकेदारांवर कारवाई करा – गजानन बाबर

एमपीसी न्यूज – वीज बिल भरण्याची अंतिम तारीख निघून गेली तरी ग्राहकांना वीज बिल वेळेत मिळत नाही. परिणामी अशा ग्राहकांना नाईलाजाने विलंब शुल्कासह बिल भरावे लागत आहे. त्यामुळे उशिरा बीज बिले देणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

ठेकेदार वेळेवर वीज बिल देत नसल्याने ग्राहकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, अशा वीज ग्राहकांकडून विलंब शुल्काची आकारणी करू नये असं त्यांनी म्हटलं आहे.

याबाबत महावितरण अभियंत्याला दिलेल्या निवेदनात बाबर यांनी म्हटले आहे, वाल्हेकरवाडी येथील शुभारंभ कॉलनीतील ब-याच ग्राहकांना 22 ऑक्टोबर रोजी वीजबिल प्राप्त झाले. मात्र, त्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर होती, ती निघून गेली आहे.

त्यामुळे त्यांना विनाकारण विलंब शुल्कासह वीजबिल भरणा करावा लागणार आहे. त्यामुळे वीजबिल वेळेवर न देणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी तसेच अशा उशिरा बिले मिळालेल्या ग्राहकांकडून विलंब शुल्काची आकारणी करू नये, अशी मागणी बाबर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.