Chinchwad News : ‘पद्मश्री’ जाहीर झाल्याबद्दल गिरीश प्रभुणे यांचा तहसीलदारांच्या हस्ते गौरव

एमपीसीन्यूज : सामाजिक कार्यातील अतुलनीय योगदानाबद्दल चिंचवडगाव येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे ( Girish Prabhune) यांना पद्मश्री ( padma shree) किताब जाहीर झाल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्यावतीने अपर पिंपरी चिंचवडच्या तहसिलदार गीता गायकवाड (Tehsildar of Pimpri Chinchwad Geeta Gaikwad)  यांच्यावतीने प्रातिनिधिक स्वरूपात श्री.  प्रभुणे यांचा कृतज्ञता गौरव करण्यात आला.

यावेळी परिविक्षाधीन तहसिलदार विजयकुमार चोबे ( Vijayakumar chobe), तलाठी आर्चना रोकडे, अतुल गीते आदी उपस्थित होते.

गिरीश प्रभुणे यांचे भटक्या-विमुक्त जाती-जमातींच्या विशेषतः पारधी समाजाच्या पुनर्वसनासाठी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. सोलापूर जिल्ह्यात यमगरवाडी येथे पारधी समाजासाठी यमगरवाडी सेवा प्रकल्प उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

चिंचवडगावातील क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे सचिव व अध्यक्ष म्हणून त्यांनी समर्थपणे धुरा पेलली आहे. क्रांतिवीर चापेकर स्मारकाबरोबरच समाजातील वंचित मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या शैक्षणिक प्रकल्पाच्या उभारणीत त्यांचे योगदान खूप मोठे आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सामाजिक समरसता मंच अशा विविध माध्यमातून त्यांनी कामाचा ठसा उमटविला. सामाजिक समरसतेचा विचार रुजविण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. सामाजिक समरसता साहित्य संमेलनाच्या आयोजनातही त्यांची महत्त्वाची भूमिका असते.

गिरीश प्रभुणे हे पत्रकार, लेखक, कवी तसेच चित्रकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. राज्य व देश पातळीवरील पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.