Chinchwad News: ठाकरे गट, राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर बाळासाहेबांची शिवसेनेत ठाकरे (Chinchwad News) गटासह विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचे इनकमिंग जोरात सुरु आहे. महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार कापसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे उपाध्यक्षा शारदा चोकसी यांनी उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

Chinchwad Business News : संक्रांती निमित्त दिलीप सोनिगरा येथे दागिन्यांची रेलचेल

उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे, माऊली जगताप, बाबीर मिटकरी, जिल्हा उपसंघटिका शारदा वाघमोडे (Chinchwad News) यांच्या प्रयत्नातून कापसे, चोकसी यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या दिपाली केदारी, सतीश साळे यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, जिल्हा संघटिका शैला पाचपुते, माजी नगरसेविका विमल जगताप, शहरप्रमुख निलेश तरस, युवासेना शहरप्रमुख विश्वजीत बारणे, चिंचवड विधानसभा संघटिका आशाताई इंगळे, रुपेश कदम, शर्वरी गावंडे, रितू कांबळे, माऊली जगताप, राजेंद्र तरस,अंकुश कोळेकर तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.