Chinchwad News : शिखर फाऊंडेशन च्या साहसी वीरांचा पराक्रम

एमपीसी न्यूज- चिंचवड येथील ‘शिखर फाऊंडेशन’ च्या तरुण क्लाईंबर्सनी 26 जानेवारी ते 28 जानेवारी 2023 या तीन दिवसांच्या अथक आणि खडतर प्रयत्ना नंतर बुलंद ‘बाण सुळका’सर ( Chinchwad News ) केला. बाण’ च्या इतिहासात नाव कोरत हा सुळका सर करणारी ‘शिखर फांऊडेशन’ ही नववी संस्था ठरली.

अहमदनगर जिल्हातील आकोले तालुका हा ट्रेकर्सची पंढरी म्हणून ओळखला जातो. या परिसरात हरिश्चंद्रगड, रतनगड, कळसुबाई, अलंग-मदन-कुलंग या सारखे अजस्त्र दुर्ग आहेत. त्याच बरोबर जगप्रसिद्ध अशी ‘सांधण दरी’ सुद्धा याच परिसरात आहे.

Mhalunge Crime : म्हाळुंगे येथे लॉजवर छापा सहा महिलांची सुटका

 

अशा या गडकोटांच्या भूमीत आकाशाला गवसणी घालणारे काही सुळके सुद्धा आपले वेगळेपण जपत वर्षानुवर्षे दिमाखात उभे आहेत. या पैकीच एक, ‘सांधण व्हॅली’ च्या जवळ आणि रतनगडच्या पाठीमागील बाजूस सह्याद्रीच्या अतिदुर्गम रांगेत आकाशाशी स्पर्धा करत उभा असलेला बेलाग ‘बाण’ सुळका. हा सुळका महाराष्ट्रातील तथा सह्याद्रीतील सर्वात आवघड आणि उंच समजला जाणारा सुळका आहे.

बाण सुळक्याची 710 फूट उंचीची 90 अंशातील काळी भिन्न काताळ भिंत भल्या- भल्या रॉक क्लाईंबर्स ची भांबोरी उडवते. पाण्याचे दुर्भिक्ष्य, मधमाश्यांची मोठमोठी पोळी, अतिशय दुर्गम प्रदेश आणि अत्यंत खडतर चढाई यामुळेच हा सुळका नेहमीच आव्हानात्मक ठरलेला आहे. स्थानिक गावकरी सुद्धा इकडे फिरकताना दिसत नाहीत. या भागातील लोक बाण सुळक्याला ‘भुत्या’ म्हणून संबोधतात. या वरूनच याची दुर्गमता लक्षात येते. म्हणूच कदाचित रॉक क्लाईंबींगच्या इतिहासात हा सुळका आता पर्यंत फक्त आठ टीमने सर केला आहे.

 

Dehugaon News : पालकांनो, मुलांना मायेचा स्पर्श द्या – इंद्रजित देशमुख

 

25 जानेवारीला चिंचवड येथून अनुभवी प्रस्तरारोहक विंक्रात शिंदे आणि प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारा जणांच्या टीमने सांधन व्हॅली च्या जवळील ‘सामरद’ च्या दिशेने प्रस्थान ठेवले. रात्रीचा मुक्काम ‘सामरद’ येथे करून टीम 26 जानेवारीला भल्या पहाटेच सुळक्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. बेसला पोहचल्यानंतर ( Chinchwad News ) आवश्यक ती तयारी करून, सकाळी 11 वाजता बाण सुळक्याच्या पूजनाने आणि प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राष्ट्रीय ध्वजाला सलामी देऊन, टीमने दुपारी 12 वाजता प्रस्तरारोहनाला सुरुवात केली. अनेक सुळक्यांवर यशस्वी चढाई करणाऱ्या तान्हाजी दौंडकर कडे प्रथम चढाईची धुरा सोपवण्यात आली. त्याचा सुरक्षा दोर साहिल लोखंडे यांने संभाळला.

लूज रॉक आणि आवघड चढाई मुळे पहिल्या दिवशी जेमतेम पहिल्या स्टेशन पर्यंतच सुद्धा मजल मारण्यात यश मिळाले नाही.दुसऱ्या दिवशी स्वप्नील आंधळे व वैभव देवकर यांनी सकाळीच आश्वासक सुरुवात करून पहिल्या स्टेशनकडे कूच केली. स्टेशन एक ते दोन ही सुद्धा तुलनेने खूपच अवघड चढाई असल्यामुळे क्लाईंबींग साठी लागणाऱ्या विविध साधनाचा वापर करून , दोन्ही रॉक च्या मध्ये असलेल्या भेगां मध्ये चोक नट अडकवत चढाई चालू ठेवली. सोसाट्याचा वारा, मधूनच घोंघावत येणाऱ्या मधमाशा, निसरडी माती आणि कोसळणारे दगड यामुळे दुसऱ्या दिवशी सुद्धा फक्त स्टेशन दोन पर्यंतची चढाई पूर्ण करण्यात यश मिळाले.

Talegaon Dabhade News : कलापिनी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने नाट्यवाचन स्पर्धा संपन्न

दोन दिवस प्रचंड खडतर आणि आव्हानात्मक गेल्यामुळे व टीम मधील अर्धे आधिक क्लाईंबर्स थकल्यामुळे तिसऱ्या दिवशी नव्या दमाची जोडी पुढे करण्यात आली. साहिल लोखंडे याला आघाडी वर तर त्याचा सुरक्षा दोर शंतनू लकडे याच्याकडे सोपवण्यात आला. आज फत्ते करायचीच या इराद्याने पेटलेल्या साहील ने पहिल्या सत्रातच तिसऱ्या स्टेशवर ताबा मिळवला. त्यांनतर वैभव देवकर यांने अघाडी घेत चौथे स्टेशन गाठले.

तोपर्यंत पाठीमागून ( Chinchwad News )शिखरचे अनुभवी प्रस्तरारोहक संजय बांठे आणि स्वप्नील आंधळे हे सुद्धा चौथ्या स्टेशनपर्यंत पोहचले. संजय यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हाः एकदा साहिल ने रॉकवर पकड मिळवत पाचवे स्टेशन गाठले. लक्ष्य टप्प्यात येताच साहिल ने पुन्हाः एकदा वेगवान चढाई करत 710 फूट उंचीच्या ‘बाण’  सुळक्यावर ‘शिखरचे’ नाव कोरले. त्यापाठोपाठ वैभव आणि संजय सुद्धा  सुळक्यावर पोहचले. सर्वांनी जय भवानी ! जय शिवाजी ! भारत माता की जय ! असा जयघोष करत आंनद साजरा केला.

टीम ने  ‘शिखरच्या फाऊंडेशन’ च्या इतिहासातील सर्वात अवघड आणि आव्हानात्मक अशी प्रस्तरारोहन मोहिम खालील सदस्यांच्या भरीव योगदानामुळे सुरक्षित पार पाडून, भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधानाचे स्मरण करून एक आगळी वेगळी मानववंदना दिली.

या मोहिमेत  विक्रांत शिंदे, प्रविण पवार, संजय भाटे,  शिवाजी चव्हण, शरद महापुरे, स्वप्नील आंधळे, वैभाव देवकर, साहिल लोखंडे, शंतनू लकडे, तान्हाजी दौंडकर, जय देशमुख, सनी धारक या सदस्यांनी सहभाग घेतला.
सहभागी सदस्यांचे शिखरचे अध्यक्ष विवेकानंद तापकीर यांनी चिंचवड येथे पोहचल्या ( Chinchwad News ) नंतर स्वागत करून अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.