Chinchwad News : उन्हाचा चटका वाढला ; शीतपेये, माठांच्या मागणीत वाढ

एमपीसी न्यूज – मार्च महिना सुरू होताच शहरात उन्हाचा चटका वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शीतपेये आणि थंड पाण्याच्या माठांची मागणी वाढली आहे. शहरात ठिकठिकाणी माठांची विक्री होत आहे. तसेच फेरीवाले देखील हातगाडीवर माठांची विकी करत आहेत.

घरातील फ्रिजमधील पाणी पिल्याने सर्दी, खोकला, डोकेदुखी आणि घशाचे आजार उद्भवत आहेत. सोबतच कोरोना सारखा आजार शहरात पसरत चालला आहे. या भितीने नागरिक माठातील पाणी पिण्यास प्राधान्य देत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

लहान, मध्यम आणि मोठ्या आकारात माठांची विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. दीडशे रूपयांपासून साडेपाचशे रुपयांपर्यंत माठाची किंमत आहे.

चिकणमातीपासून तयार करण्यात आलेल्या या माठांमधून पाणी झिरपण्याचे प्रमाण कमी असते. यामध्ये काळ्या माठांस नागरिकांची पसंती अधिक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

तसेच शीतपेयांमध्ये सरबत, लस्सी, ताक, ज्यूस, फळं याशिवाय विविध कंपन्यांची तयार शीतपेय घेण्यावर नागरिक भर देत आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असून नागरिकांची पाऊले आपोआप रसवंती गृहांकडे वळत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.