Chinchwad News : कोरोना युद्धात लोकमान्य हॉस्पिटलचे काम कौतुकास्पद – आमदार आण्णा बनसोडे

लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आजवर 900 पेक्षा अधिक कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य हॉस्पिटलने सर्वप्रथम कोरोना समर्पित रुग्णालय होण्याची तयारी दर्शवली. लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आजवर 900 पेक्षा अधिक कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. कोरोना युद्धात लोकमान्य हॉस्पिटलचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार आमदार आण्णा बनसोडे यांनी काढले.

आमदार बनसोडे यांनी लोकमान्य हॉस्पिटलला भेट दिली व गणरायाची आरती केली, त्यावेळी ते बोलत होते. कोरोना विषाणूंच्या संकटातून राज्य व देशाची लवकर सुटका व्हावी, असे साकडे त्यांनी गणरायाला घातले.

कोरोना काळात प्रामाणिक कर्तव्य बजावणाऱ्या डाॅक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी हेच खरे देवदूत असून गणपती बाप्पाने त्यांना लढण्याचे बळ द्यावे, असे बनसोडे म्हणाले.

_MPC_DIR_MPU_II

लोकमान्य हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी धैर्य दाखवून या कठीण काळात काम केले असून हिच खरी ईश्वर सेवा असल्याचेही ते म्हणाले.

याप्रसंगी डॉ. जयवंत श्रीखंडे, महेश भोसले, राजेश देशमुख, सहदेव गोळे, सिद्धार्थ गजरमल, संगीता कदम, भरत गराडे, राज प्रेमा, राजेंद्र कदम, प्रभाकर पाटील, वैशाली बावस्कर, सुनिल पवार, प्रितम वरधान, रोहिणी सरफले, अनंत वैद्य, डॉ. पुष्पराज पटेल, डॉ. नामदेव कलाले, संतोष जगताप, मारुती चव्हाण, स्मिता गवळी, डॉ. स्वप्निल पाटील, स्नेहल मिकूले, प्रदिप सपकाळ, दशरथ खेत्रे, जेस्सी बिजी यांचा सन्मान करण्यात आला.

लोकमान्य हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी प्रास्ताविक केले. गृप सीईओ सुनील काळे, कर्मचारी प्रतिनिधी अध्यक्ष मधुकर काटे यांनी स्वागत केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.