Chinchwad News: पिंपरी-चिंचवड शहरात एकाच दिवशी आठ वाहनांच्या चोरीच्या घटना

एकाच दिवशी एवढ्या घटना समोर आल्याने भीतीदायक आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात एकाच दिवशी आठ वाहनचोरीच्या घटना घडल्या आहेत. याबाबत एमआयडीसी भोसरी, पिंपरी, चाकण, देहूरोड, वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात शनिवारी (दि.29) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकाच दिवशी एवढ्या घटना समोर आल्याने भीतीदायक आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दुचाकी चोरीची पहिली घटना शाहूनगर, चिंचवड येथे घडली. सोनू छोटेलाल सरोज (वय 30, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची यामाहा दुचाकी शुक्रवारी (दि.28) रात्री सात वाजता त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. शनिवारी (दि. 29) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

दुचाकी चोरीची दुसरी घटना डेक्कन होंडा शोरूम समोर पिंपरी येथे उघडकीस आली. शुभम लक्ष्मण बाणे (वय 25, रा. घरकुल, चिखली) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची हिरो होंडा सीडी डिलक्स दुचाकी (एमएच 14 सीटी 1426) 16 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता पिंपरी येथील डेक्कन होंडा शोरूम समोर पार्क केली होती. दिवसभरात अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सायंकाळी सहा वाजता उघडकीस आला. याबाबत नऊ महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी चोरीची तिसरी घटना पिंपरी येथील शगुन चौकात फूल मार्केट येथे घडली. खादीर गनीसाब शेख (वय 41, रा. भोसरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शेख यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची होंडा शाईन दुचाकी (एमएच 23 एके 6318) 18 जून रोजी दुपारी दोन वाजता पिंपरी येथील शगुन चौकातील फूल मार्केटमध्ये सार्वजनिक रस्त्याच्या बाजूला पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

दुचाकी चोरीची चौथी घटना खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथून समोर आली. प्रशांत गोविंद पोतले (वय 34, रा. मोहीतेवाडी, शेल पिंपळगाव, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी पोतले यांची 9 हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस दुचाकी (एमएच 14 बीएस 4803) अज्ञात चोरट्यांनी शेलपिंपळगाव हद्दीतून चोरून नेली. हा प्रकार शनिवारी (दि.29) पहाटे साडेपाच वाजता उघडकीस आला.

दुचाकी चोरीची पाचवी घटना नोघोजे येथे महिंद्रा कंपनीच्या गेटवर घडली. सचिन मारुती झोंबाडे (वय 35, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी झोंबाडे यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची पल्सर दुचाकी (एमएच 14 सीबी 7796) 27 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता निघोजे येथील महिंद्रा कंपनीच्या गेट नंबर तीनच्या समोर रस्त्याच्या बाजूला पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली.

दुचाकी चोरीची सहावी घटना खराबवाडी येथे घडली. ज्ञानेश्वर प्रदीप जाधव (वय 32, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी जाधव यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर दुचाकी (एमएच 14 जीटी 2563) 26 ऑगस्ट रोजी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास खराबवाडी येथे पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. वरील तिन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

दुचाकी चोरीची सातवी घटना देहूगाव येथील जैन मंदिरासमोर घडली. शांतीलाल करसनभाई सोलंकी (वय 49, रा. देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सोलंकी यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी (एमएच 14 सेवाय 4574) 27 ऑगस्ट रोजी त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. ही घटना दुपारी अडीच वाजता उघडकीस आली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

दुचाकी चोरीची आठवी घटना डांगे चौक, थेरगाव येथे उघडकीस आली. रामनरेश रामासरे प्रजापती (वय 48, रा. ताथवडे, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी प्रजापती यांनी त्यांची 18 हजार 500 रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस दुचाकी (एमएच 14 सीझेड 9116) 26 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता डांगे चौक, थेरगाव येथे पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 27 ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजता उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.