Chinchwad News: अधिकाऱ्यांच्या बदल्या करा, माल कमवा एवढेच सरकारचे काम; देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र

एमपीसी न्यूज – कोरोना काळात सर्वात समृद्ध राज्य असलेल्या महाराष्ट्र सरकारने एक नव्या पैशांची मदत कोणाला केली नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्या करा, माल कमवा या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम सरकारच्या माध्यमातून होताना दिसत नाही. केवळ तुम्ही तुमच्या घरी रहा, तुमचं कुटुंब सांभाळा आणि आम्ही आमच्या घरी राहतो. आमचे कुटुंब सांभाळतो. याव्यतिरिक्त कोणतेही काम कोरोना काळात झाले नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

चिंचवडमध्ये बोलताना फडणवीस म्हणाले, देशातील लोकांना बोलघेवडे लोक आवडत नाहीत. कर्मयोगी लोक आवडतात. जे केवळ बोलतात काहीच करत नाहीत. कोरोना काळात महाराष्ट्र सरकारने एक नव्या पैशांची मदत कोणाला केली नाही. बारा बलुतेदार, गरीब, फुटपाथ दुकानदार, शेतकरी, महिलांना मदत नाही. समाजातील कोणत्याही घटकाला एका फुटक्या कवडीची मदत केली नाही.

छोट्या-छोट्या राज्यांनी देखील काही पॅकेजेस तयार केली. जनतेला मदत केली. पण, देशातील सर्वात समृद्ध राज्य असलेल्या महाराष्ट्राने एका फुटक्या कवडीची मदत कोणाला केली नाही. केवळ तुम्ही तुमच्या घरी रहा, तुमचं कुटुंब सांभाळा आणि आम्ही आमच्या घरी राहतो. आमचे कुटुंब सांभाळतो. याच्या व्यतिरिक्त कोणतेही काम कोरोना काळात झाले नाही.

अधिकाऱ्यांच्या बदल्या करा, माल कमवा एवढेच सरकारचे काम

एकच धंदा चालला आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या करा, माल कमवा या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम सरकारच्या माध्यमातून होताना दिसत नाही. दलालांचा सुळसुळाट आहे. एका अधिकाऱ्याला चार-चार दलाल फोन करतात. आम्ही तुमची बदली करुन देतो. आमचे जरा पक्के करा. दुसरा म्हणतो मी त्याहीपेक्षा तुमचे जास्त चांगल्या ठिकाणी करुन देतो. तुम्ही माझ्याशी पक्के करा. अशा प्रकारचे प्रशासन आणि अशा प्रकारची अवस्था या महाराष्ट्राने यापूर्वी कधीही पाहिली नाही. खूप मोठा असंतोष जनतेत तयार झाला आहे, असेही फडणवीस म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.