Chinchwad News: दुचाकीस्वाराने चोरला हातातील मोबाईल

एमपीसी न्यूज – मोबाईलवर जवळचे (Chinchwad News) एटीएम सर्चिंग करत असताना दुचाकीवरुन आलेल्या एकाने 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबविला. ही घटना गुरुवारी (दि.2) प्रेमलोक पार्क, चिंचवड येथे घडली.

Dehuroad News: फ्लेक्सच्या वादातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

याप्रकरणी योगेश सुरेश कोतकर (वय 31, प्रेमलोक पार्क, चिंचवड) याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
योगेश त्याचा भाऊ मयुर याच्यासोबत एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आले होते. जवळचे एटीएम कार्ड मोबाईलवर सर्चिंग करत होता. त्यावेळी प्रेमलोक पार्क कडून आलेल्या दुचाकीस्वाराने त्याच्या हातातील 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने (Chinchwad News) हिसकावून नेला, असे पोलिसांनी सांगितले. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.