Chinchwad News: ‘एम्पायर इस्टेट पुलाखाली विरंगुळा केंद्र, वाहनतळ, उद्यान विकसित करणार’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे एम्पायर इस्टेट येथील सेंट मदर टेरेसा पुलाखालील मोकळ्या जागेत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज विरंगुळा केंद्र, वाहनतळ, उद्यान विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजे 10 कोटी 98 लाख रुपये इतका खर्च येणार आहे.

एम्पायर इस्टेट येथील पुलाखालील जागेत सुशोभिकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन महापौर ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

उपमहापौर केशव घोळवे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्ष शर्मिला बाबर, नगरसदस्य शैलेश मोरे, शितल शिंदे, नगरसदस्या जयश्री गावडे, कोमल मेवानी, माजी नगरसदस्य प्रसाद शेट्टी, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, उपअभियंता रविंद्र सुर्यवंशी, अशोक कुटे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आणि या भागातील नागरिक उपस्थित होते.

चिंचवड येथील एम्पायर इस्टेट मधील सेंट मदर टेरेसा पुलाखालील मोकळ्या जागेत विकसीत करण्यात येणा-या विविध सुविधांचा नागरिकांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी चांगला उपयोग होईल. कोरोना काळात नागरिकांनी चांगले सहकार्य केले.

कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येकाने सर्वतोपरी काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर ढोरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.