Chinchwad News: विज्ञान दिनानिमित्त सायन्स पार्कमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त 28 फेब्रुवारी आणि 2 मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांसाठी मोफत प्रवेश असणार आहे.

28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रतिकृती बनविणे कार्यशाळा होणार आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन आयोजित विज्ञान प्रदर्शन तर दुपारी 12 ते 1 वेळेत ‘शोध इन्शुलिनचा ‘ या विषयावर प्रा. व्ही. जी. गंभीर यांचे व्याख्यान होईल.

_MPC_DIR_MPU_II

दुपारी 3 ते 4 या वेळेत 5 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी खगोल विज्ञान विषयावर प्रश्नमंजुषा होणार आहे. दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत ‘अणुउर्जा, स्वच्छ, हरित व सुरक्षित पर्याय’ या विषयावर एस.के. जेना यांचे ऑनलाईन व्याख्यान होणार आहे. सायंकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत आकाश दर्शन हा कार्यक्रम होणार आहे.

2 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत विज्ञान रंजन स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत लॉकडाऊन कालावधीतील आयोजित विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.