Chinchwad : वयाच्या 85 व्या वर्षी दोन ग्रंथ लिहिणा-या विनायक फडके यांचा विशेष सन्मान

एमपीसी  न्यूज –  शरीराला वार्धक्य येऊ शकते, पण इच्छाशक्तीला कधीच नाही. चिंचवडच्या विनायक पुरुषोत्तम फडके यांनी वयाच्या 85 व्या वर्षी दोन ग्रंथ लिहून याचीच प्रचिती दिली. त्याबद्दल गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि मन करा रे प्रसन्न ट्रस्ट यांच्या वतीने फडके यांचा नुकताच विशेष सन्मान करण्यात आला.
गांधीपेठ तालीम मित्र मंडळ आणि मन करा रे प्रसन्न ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडमध्ये प्रवचन मालिका आयोजित केली होती. त्यामध्ये ज्येष्ठ निरुपणकार डॉ. संजय उपाध्ये यांच्या हस्ते विनायक फडके यांना विशेष सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले. गीतातत्व दर्शन खंड एक व खंड दोन असे दोन ग्रंथ लिहिल्याबद्दल त्यांचा हा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. उपाध्ये यांनी फडके यांच्या लिखाणाविषयी गौरवोद्गार काढले. फडके यांचे लिखाण अभ्यासपूर्ण आणि लेखनशैली ओघवती असून सर्वांनी हे ग्रंथ आवर्जून वाचावेत, असे डॉ. उपाध्ये म्हणाले.
ज्याला विचार करण्याची सवय असते. त्याला लिखाणाची आवड आपोआप निर्माण होते. त्यासाठी वयाची अट नसते. गेल्या दीड वर्षापासून या विषयीचा सातत्याने अभ्यास करुन त्यांनी हे ग्रंथ लिहिले. आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.  ग्रंथालय भारती नागपूर, पुणे मराठी ग्रंथालय आदी नामांकित संस्थांच्या पुरस्कारांचाही समावेश आहे.
 या ग्रंथांबाबत माहिती देताना विनायक फडके म्हणाले की, गेल्या दीड वर्षापासून ग्रंथाचे काम सुरु आहे. ते आज कुठे फळाला आले. आतापर्यंत 7 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात मराठी दासबोध, सार्थ आत्माराम, ज्ञानेश्वरी, आरोग्यासाठी मंत्र, आरोग्यदायी दिनचर्या अशी पुस्तके प्रकाशित झाली आहे. गीतातत्वदर्शन खंड एक व खंड दोन यामध्ये पाच ग्रंथ एकत्र करुन खंड लिहिले आहेत. त्यात  भगवतगीता श्लोक , श्लोकाचा अर्थ, अभंग ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीतील टीका आदींचा अभ्यास करुन तो ग्रंथामध्ये मांडला आहे. 2006 पासून विविध विषयावरील ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली.
Attachments area

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.