Chinchwad News : ब्राह्मण महासंघातर्फे स्तनांचा कर्करोग तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने महिलांसाठी स्तनांचा कर्करोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. गुरुवारी (दि. 25) हे शिबिर पार पडले. प्राधिकरणातील तीस महिलांची या शिबिरात तपासणी करण्यात आली.

महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता या पद्धतीने वेळीच तपासणी झाली तर योग्य औषध उपचारानंतर कर्करोग बरा होऊ शकतो. त्यामुळे ‘प्रयास’ संस्थेने हा उपक्रम राबवला. पिंपरी-चिंचवड अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्ष शर्मिला महाजन उपस्थित होत्या.

_MPC_DIR_MPU_II

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने संपूर्ण शहरात हा उपक्रम राबवण्याचा मानस आहे, असे अध्यक्ष शर्मिला महाजन यांनी सांगितले.

शिबिरासाठी वृंदा गोसावी, ॲड. अंतरा देशपांडे, प्रयास संस्थेच्या डॉ‌. वैशाली व सर्व पदाधिकारी महिलांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.