Chinchwad News : हॅबीटॅट इंडिया व ‘एसबीआय कॅपीटल’ने दिलेल्या 125 बेडचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते लोकार्पण

एमपीसी न्यूज – हॅबीटॅट इंडिया व एसबीआय कॅपीटल मार्केट यांच्या वतीने चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटल व अन्य तीन हाॅस्पीटल यांना उपलब्ध करून दिलेल्या 125 बेडस व साहित्यांचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये हा सोहळा आज (शनिवारी) पार पडला.

याप्रसंगी भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे, उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, शितल शिंदे, राजेंद्र गावडे, लोकमान्य हॉस्पिटलचे उपाध्यक्ष कॅप्टन हेमंत कुलकर्णी, ग्रुप सीओओ सुनिल काळे, हॅबिटॅट फाॅर ह्युमॅनिटीचे व्यवस्थापकीय संचालक राजन सॅम्युएल, सहयोगी संचालक जाॅन मॅथ्यूज उपस्थित होते.

आमदार लांडगे यांनी लोकमान्य हॉस्पिटलच्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ व इतर सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. आमदार लांडगे म्हणाले, शहरात सर्वात अगोदर लोकमान्य हॉस्पिटलने कोवीड समर्पित रुग्णालय होऊन महत्त्वाची भूमिका बजावली. कोरोनाच्या काळात खरे देवदूत हॉस्पिटलमध्येच भेटतात.

हॅबीटॅट इंडिया व एसबीआय कॅपीटल मार्केट यांच्या वतीने देण्यात आलेल्या बेड व साहित्य यामुळे कोरोना रुग्णांसाठी बेडची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो. कोरोनाची लढाई सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असून यातून लवकरच मार्ग निघेल, अशी प्रार्थना करुया असं आमदार लांडगे म्हणाले.

डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी लोकमान्य हॉस्पिटलचा थोडक्यात आढावा घेऊन येथील कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 94.2 टक्के असल्याचे सांगितले.

लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आजवर 1427 कोरोना रुग्ण दाखल झाले. त्यापैकी 1227 बरे झाले तर 81 रुग्ण दगावले. सध्या रुग्णालयात 119 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

हॅबिटॅट फाॅर ह्युमॅनिटीचे सहयोगी संचालक जाॅन मॅथ्यूज यांनी याप्रसंगी हॅबिटॅट फाॅर ह्युमॅनिटीच्या कामाची माहिती दिली. लोकमान्य हॉस्पिटलसह स्टार हाॅस्पिटल, स्टर्लिंग हॉस्पिटल आणि संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल यांना प्रत्येकी 25 बेड उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

यासह बेडशीट, पिलो कव्हर यासारखे साहित्य देखील पुरवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कॅप्टन हेमंत कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सुनील काळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.