chinchwad News : शिवजयंतीनिमित्त सर्वरोग निदान शिबीरात 500 रुग्णांची तपासणी

एमपीसीन्यूज : शिवजयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड प्रभाग क्र.11  कृष्णानगर येथे आयोजित केलेल्या सर्वरोग निदान शिबीरात 500 रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे.

शिवाजी पार्क येथील स्वामी विवेकानंद क्रिडांगण येथे हे शिबीर आयोजित करण्यात आले.  महापौर माई ढोरे व उपमहापौर केशव घोळवे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजन करून शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.

प्रसंगी शिबिराच्या संयोजिका नगसेविका योगिता नागरगोजे, ज्ञानेश्वर नागरगोजे, कुंदन गायकवाड, आबासाहेब नागरगोजे, महादे कवितके, विजय घोडके, यशवंत कण्हेरे, शिवानंद चौगुले, पद्माकर काकडे, रमेश ब्रम्हा, शशिकांत औरंगाबादकर, प्रकाश धोंडे, कविता करदात, विमल सानप, कुसूम नागरगोजे व नागरिक उपस्थित होते.

मधुमेहतज्ञ डॉ.संदिप पाटील (मुळे) यांनी कृष्णानगर व परिसरातील जनतेची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले. तसेच आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी 300 रुग्णांची मधुमेह व रक्तदाब तर 200 रुग्णांची हिमोग्लोबीन पातळी आणि रक्तगट तपासणी करण्यात आली.

योगिता नागरगोजे यांनी उपस्थितांचे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.