Chinchwad News : चिंचवडमध्ये पंधरा दिवस मोफत ‘फूट प्लस थेरपी’ शिबीर

एमपीसी न्यूज – चिंचवड येथे पंधरा दिवस मोफत ‘फूट प्लस थेरपी’ शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते चेतन गावडे व चेतन गावडे सोशल वेल्फेअर तर्फे 2 ते 16 फेब्रुवारी या कालावधीत हे शिबीर पार पडणार आहे.

चिंचवडमधील कै. गणपत नाथोबा गावडे व्यायाम शाळा गावडे पार्क याठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी सहाच्या दरम्यान हे शिबीर असेल.

फुट पल्स थेरपीच्या माध्यमातून मधुमेह, मधुमेहामुळे पाय दुखणे, रक्तदाब, संधीवात, कंबर दुखी, हातपायाला मुंग्या येणे, चक्कर येणे (भोवळ येणे), वजन कमी करणे, स्नायु दुखणे, मानेसंबधीत आजार व मणक्यांची सुज, पाठदुखी, मज्जातंतुच्या आजारांपासून आराम मिळतो असे आयोजकांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.