Chinchwad News : मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी 61 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, 61 ज्येष्ठांना वृक्षरोपांचे वाटप

एमपीसी न्यूज – शिवसेना नगरसेविका मीनल यादव, शिवसेना पिंपरी-चिंचवड शहर संघटक विशाल यादव, अष्टविनायक मित्रमंडळ आणि शिवसेना शाखा मोहननगर यांच्यावतीने मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. दहावीमध्ये 75% पेक्षा जास्त मार्क पडलेल्या 61 विद्यार्थ्यांचा गौरव तसेच 61 ज्येष्ठ नागरिकांना शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या हस्ते वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बाबर, विभागप्रमुख नाना काळभोर, पिंपरी-चिंचवड शिवसेना संघटक विजय गुप्ता, तात्या काळभोर, तात्या शिंदे ,नागेश नामदे, शशिकांत पाडाळे, मधुसूदन आंबुसकर, सोमनाथ अलंकार, चंद्रकांत कोकाटे , भाई भोसले, निखिल येवले, आशिष बाबर, शिवसेना महिला आघाडीच्या पाटील काकू, दीपाली धावडे, मोरे मामी, प्रांजल पाडेकर यांच्यासह मोहननगर काळभोर नगरमधील अनेक नागरिक तसेच शिवसैनिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सूत्रसंचलन काका शेळके यांनी केले.

नूतन पदाधिका-यांचा सत्कार

शिवसेनेचे शहर पदाधिकारी नुकतेच जाहीर झाले आहेत. यातील पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, पिंपरी उपशहरप्रमुख अमोल निकम, पिंपरी-चिंचवड शहर संघटक रोमी संधू , विभाग समन्वयक भाविक देशमुख, विभागप्रमुख गोरख नवघरे या नवीन पदाधिका-यांचाही सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.