-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chinchwad News : देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका गोरखे यांच्यातर्फे भजनी मंडळांना साहित्य वाटप

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप नगरसेविका अनुराधा गोरखे व प्रदेश सचिव अमित गोरखे यांच्या वतीने दत्तनगर परिसरातील श्री दत्त महिला भजनी मंडळ यांना भजन साहित्य वाटप करण्यात आले. शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते हे साहित्य देण्यात आले.

माजी उपमहापौर तुषार हिंगे, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सुभाष सरोदे, स्वीकृत सदस्य सुनील कदम, शुभांगी कसबे, निर्मला अलंकार, यशवंत दनाने, नेताजी शिंदे, विजय वाघमारे, अजिंक्य गोळे, विठ्ठल शिंदे, तानाजी साठे, सुनील शेलार, रोहन खुडे, भानुदास नेटके, प्रशांत शिंदे, अमोल कुचेकर, मनोज कसबे , राजू विटकर, गणेश लोंढे उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले, भजनी मंडळ एका अर्थाने लोकसेवेचे काम करीत आहे. मंदिरांमध्ये अथवा घरात बसून एकचित्ताने भजन म्हणून देवाची प्रार्थना करणे व मन शांतीचा शोध घेणे ही एक प्रकारची लोकसेवा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक वेगळा उपक्रम गोरखे परिवाराच्या वतीने घेतला आहे.

अमित गोरखे यांनी प्रास्ताविक केले. तानाजी साठे यांनी सूत्रसंचालन केले. तर, नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी आभार मानले.

 

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn