Chinchwad crime News : रावण टोळीचा म्होरक्या व त्याच्या साथीदाराला अटक, एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त

Ravana gang leader and his accomplice arrested, one pistol and two live cartridges seized

एमपीसी न्यूज – चार वर्षापासून दरोड्याच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला रावण टोळीचा म्होरक्या व त्याच्या साथीदाराला अग्निशस्त्र व दोन जिवंत काडतुसांसह चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

विकी ऊर्फ अनिरूद्व राजू जाधव ( वय 24, रा. जाधव वस्ती, रावेत, पुणे ) व मन्या ऊर्फ नंदकिशोर शेषराव हाडे (वय 22, रा. जाधव वस्ती, रावेत, पुणे) यांना अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील गुरूद्वारा चौकाकडून तहसील कार्यालयाकडे रेल्वे पटरीच्या खालून जाणा-या रोडच्या बाजूस दोन व्यक्ती संशयीत रित्या फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी चारही बाजूने तपासपथकातील कर्मचा-यांना पाठवून सापळा रचला व मोठ्या शिताफीने दोघांना पकडले.

त्यांची झडती घेतली असता त्यांच्या जवळून एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुस असा 35,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी विकी ऊर्फ अनिरूद्ध राजू जाधव हा सध्या रावण टोळीचा म्होरक्या व सराईत गुन्हेगार असून नुकताच मोक्याच्या गुन्ह्यातून जामीनावर सुटला आहे.

तर ,आरोपी मन्या ऊर्फ नंदकिशोर शेषराव हाडे हा देखिल रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुढील चिंचवड तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.