Chinchwad News : आनंदनगरमधील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करा : मनसे

एमपीसीन्यूज : चिंचवड, आनंदनगर येथील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती कारण्यासह गतिरोधकांची उंची नियमानुसार करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

याबाबत मनसे विधी न न्याय कक्षाच्या शिष्टमंडळाने महापालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालयात क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात चिंचवड येथील अंतर्गत रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यात आले आहे. आनंदनगर येथील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

गतिरोधकांची उंचीही नियमानुसार नाही. त्यामुळे दुचाकी व अन्य वाहनचालकांना वाहने चालविताना त्रास सहन करावा लागत आहे. अपघातही होऊ लागले आहेत.

मनसे विधी न न्याय कक्षाचे शहर उपाध्यक्ष मिलिंद सोनवणे, महेंद्र निशिगंध, शैलेश पाटील, संजय मोरे, उल्हास जतकर आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.