chinchwad News : भाजप ओबीसी महिला मोर्चाच्या शहराध्यक्षपदी सारिका पवार

एमपीसीन्यूज : चिंचवड, पूर्णानगर येथील भाजपच्या महिला कार्यकर्त्या सारिका महेंद्र पवार यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी महिला मोर्चाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे तसेच महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे यांच्या हस्ते बडगुजर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

या वेळी भाजप शहर सरचिटणीस अमोल थोरात, राजू दुर्गे, विजू फुगे आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाने माझ्यावर ओबीसी महिला मोर्चाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात पदाच्या माध्यमातून  शहरातील ओबीसी समाजाचे संघटन करण्याबरोबरच महापालिकेतील विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यास प्रयत्न केले जातील. शहरातील विविध समाजातील गरीब कुटुंबांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही बडगुजर यांनी निवडीनंतर दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.