_MPC_DIR_MPU_III

Chinchwad: कुख्यात गुन्हेगार अक्षय भोसले स्थानबद्ध

Chinchwad: Notorious criminal Akshay Bhosale Detained त्याने आत्तापर्यंत पाच गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्या गुन्ह्यांचा चढता आलेख पाहून त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज – कुख्यात गुन्हेगार अक्षय दिलीप भोसले (वय 22, रा. पापडगल्ली, पवनानगर, काळेवाडी, पुणे) याला पोलीस आयुक्त संदीप विष्णोई यांनी एमपीडीए कायद्याखाली स्थानबध्दतेचे आदेश दिले. या आदेशानुसार त्याला गुरूवारी (दि.16) येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द्‌ करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_IV

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील गुन्हेगारांचा अभिलेख तपासून त्यांच्यावर मोक्का व एमपीडीए कायद्या अंतर्गत परिणामकारक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

अक्षय भोसले हा वाकड व पिंपरी परिसरात लोखंडी रॉड, कोयता, यासारख्या जीवघेण्या हत्यारांसह दंगा, तोडफोड करून मालमत्तेचे नुकसान करणे, गंभीर दुखापत, अवैधरित्या शस्त्र जवळ बाळगणे, यासारखे गुन्हे करणारा कुख्यात गुन्हेगार आहे.

त्याने आत्तापर्यंत पाच गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्या गुन्ह्यांचा चढता आलेख पाहून त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.