Novel School: नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांसमवेत रक्षाबंधन

एमपीसी न्यूज:नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये Novel school) विद्यार्थ्यांनी जवानांना राखी बांधून आगळ्यावेगळ्या पद्धतीने 8 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे केले.

या प्रसंगी नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, संस्थेचे कार्यकारी संचालक विलास जेऊरकर,  शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. मानसी हसबनीस, तांत्रिक विभाग प्रमुख  समीर जेऊरकर, आणि शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Amruta Fadnavis  : अमृता फडणवीसांबद्दल अश्लील कमेंटप्रकरणी पुण्यात तरुणाला अटक

यावेळी नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. प्रिया गोरखे यांनी, देशाची सुरक्षा करण्यासाठी आणि कायद – सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वच यंत्रणांचे जवान अहोरात्र झटत असतात.(Novel School) हे सर्वच नारीशक्तीचे रक्षणकर्ते असून एक जवान समाजातील हजारो बहिणींसाठी भाऊ असतो, असे मत व्यक्त केले.‌

शाळेमध्ये प्रत्येक मजल्यावर एक बॉक्स ठेवण्यात आला आहे.‌ त्यात इयत्ता 6 वी ते 10 वीच्या विध्यार्थिनींनी स्वहस्ते बनविलेल्या राख्या जवानांसाठी जमा केल्या.(Novel School) सर्व राख्या एका चार्टवर कलात्मकता पुर्वक सजविण्यात आल्या होत्या. इयता 9 वीच्या विद्यार्थीनींनी रक्षाबंधनाचे महत्व सांगून बहिण आणि भावाचे नाते किती अतूट आहे, या विषयीची माहिती दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.