Chinchwad : कारच्‍या धडकेत वृद्धाचा मृत्‍यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगातील कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्‍वार वृद्धाचा (Chinchwad)मृत्‍यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 2) दुपारी वाल्‍हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.
शालिवाहन सखाराम कल्‍याणी (वय 65, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) असे अपघातात मृत्‍यू झालेल्‍या वृद्धाचे नाव आहे.

Panvel : ‘अब की बार चार सौ पार’च्या घोषणांमध्ये पनवेलमध्ये भाजपकडून बारणे यांचे स्वागत

चिंचवड पोलीस ठाण्‍याचे वरिष्‍ठ निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, (Chinchwad)मयत शालिवाहन हे दुचाकीवरून बिजलीनगरहून चिंतामणी चौकाच्‍या दिशेने येत होते. त्‍यावेळी एक कार (एमएच 14/एफजी 8118) भरधाव वेगात आली.
कार चालकाला गतीरोधकाचा अंदाज न असल्‍याने कार अनियंत्रित झाली. कारने पुढे चाललेल्‍या शालिवाहन यांच्‍या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्‍या शालिवाहन यांना रुग्‍णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्‍यांचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.