Chinchwad : गझलपुष्प समूहाच्या वतीने रविवारी चिंचवडला मराठी गझल मुशायरा

एमपीसी न्यूज – गझलपुष्प (पिंपरी-चिंचवड) समूहाच्या वतीने रविवार (दि.7 जुलैला) चिंचवड येथील खुशबू बंगल्यात ही मराठी गझल मुशायरा सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

या गझल मुशाय-यामध्ये ज्येष्ठ गझलकार प्रा. तुकाराम पाटील, प्रदीप गांधलीकर, प्रशांत पोरे, संदीप जाधव, विवेक कुलकर्णी, सुहास घुमरे, पोपट खारतोडे आणि आय.के.शेख सहभागी होणार आहे. विनाशुल्क असलेल्या या कार्यक्रमाचा रसिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.