Chinchwad : प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात शनिवारी ‘जाता पंढरीसी’ संगीत मैफल

एमपीसी न्यूज – संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या हजारो वारक-यांसोबत पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. आषाढी एकादशीचे वातावरण तयार होत आहे. याच पार्श्वभूमीवर थोर संतांच्या रचना आणि अन्य भक्तिगीतांच्या ‘जाता पंढरीसी’ या संगीतमैफलींचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री स्वामी समर्थ एंटरप्रायझेस आणि स्वरसायली यांनी या मैफलीचे आयोजन केले आहे. चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात शनिवारी (दि. 6) सायंकाळी पाच वाजता ही मैफल होणार आहे.

  • संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा या संतांच्या रचना व अन्य भक्‍तीगीतांच्या रचना नामवंत कलाकार सादर करणार आहेत.

कीर्ति शिलेदार, अजित कडकडे, सुरेश साखवळकर, अस्मिता चिंचाळकर, श्रीरंग भावे, सायली राजहंस, कु. ऋचा पाटील, चैतन्य देवडे हे कलाकार रचना सादर करणार आहेत. ह.भ.प. चारुदत्त आफळे हे निरुपण करणार आहेत. ऑर्गन साथ लीलाधर चक्रदेव, तबला अभिजित जायदे, व्हायोलीन रमाकांत परांजपे, पखवाज ओंकार दळवी, सिंथेसायझर अनय गाडगीळ व टाळाची साथ आदित्य आपटे करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.