Chinchwad : क्रांतिवीर दामोदर हरि चापेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे चापेकर यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – क्रांतिवीर दामोदर हरि चापेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंचवड गाव चापेकर चौक येथे  गुरुवारी (दि.18) विविध (Chinchwad) कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ढोल-ताशा, लेझीम पथक, क्रांतिवीरांच्या वेशभूषेतील विद्यार्थी, क्रांतिवीरांचा जयघोष, शंभर टक्के मतदान जनजागृती  करणारे फलक यांसह भव्य अभिवादन फेरी चिंचवड परिसरातून काढण्यात आली.

यावेळी क्रांतिवीर चापेकरांचे वंशज राजीव चापेकर, अनुजा चापेकर, मंजिरी गोडसे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, सदस्य अशोक पारखी, सुहास पोफळे, आसराम कसबे, मधुसूदन जाधव, लाठी काठी आणि दांडपट्टा पथकाच्या प्रमुख मोनिका पेंढारकर, अतुल आडे असे मान्यवर तसेच समितीच्या शाळांचे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Maval LokSabha Elections 2024 : महायुतीचा रहाटणीत युवा मेळावा

चापेकर चौक येथील क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मारकास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुनरुत्थान समरसता गुरुकुलम च्या विद्यार्थ्यांनी ‘चापेकरांची शिकवण..’ हे गीत गाऊन अभिवादन केले. अभिवादन फेरीतील लाठी-काठी, दांडपट्टा पथकाच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

क्रांतिकारकांचे पोवाडे, कवने फक्त अनुस्मरण करणार्‍यांनी नव्हे तर अनुकरण करणार्‍या शूर मर्दांनीच गावेत, असे आग्रहाने  सांगताना चापेकर बंधूंचे कार्य, विचार हे तरुणांच्या कृतीमधून, आचरणातून प्रकट झाले पाहिजे आणि हे मूल्य विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याची जबाबदारी आजच्या शिक्षकवर्गाची आहे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आनंद रायचूर यांचे राष्ट्रप्रेमाने भारावलेले शब्द, त्यांची मनात देशभक्तीची ज्वाला चेतवणारी देहबोली, आवाजात जरब यामुळे श्रोता वर्ग भारावून गेला होता. कार्यक्रमाचे आभार समितीचे सदस्य आसराम कसबे यांनी मानले; तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे आचार्य सतीश अवचार यांनी केले. क्रांतिवीर चापेकर स्तवनाने कार्यक्रमाचा समारोप (Chinchwad) करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.