_MPC_DIR_MPU_III

Chinchwad : तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

One accused of inciting a youth to commit suicide

एमपीसी न्यूज – दारूच्या नशेत  तरुणाला शिवीगाळ करून अपमान करत त्याचा मानसिक छळ केला. हा प्रकार वारंवार घडल्याने छळाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत शिवीगाळ करून अपमान करणा-या तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 नोव्हेंबर 2019 ते 17 मे 2020 या कालावधीत वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड येथे घडली.

_MPC_DIR_MPU_IV

शरद सुभाष भोसले (वय 29, रा. वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गणेश अशोक साळुंखे (वय 20, रा. इंद्रायणीनगर, भोसरी. मूळ रा. गटेवाडी, ता. पारनेर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी मयत तरुणाचे वडील अशोक चंदर साळुंखे (वय 39) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शरद याने स्वतःच्या बायकोवर संशय घेऊन तिला बेल्ट आणि काठीने मारहाण केली. तसेच स्वतःचा मोबईल फोन फोडून टाकला. या प्रकारानंतर शरद टेन्शनमध्ये होता.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, शरद याने मयत गणेश याला नोकरीला लावतो असे आमिष दाखवले होते. त्यासाठी त्याने गणेशकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती.

मात्र, गणेश एवढी मोठी रक्कम देऊ शकत नव्हता. यामुळे आरोपी शरद हा गणेश याला मानसिक व शारीरिक त्रास देत होता. तसेच लॉकडाऊनच्या काळात त्याला घरातील कामे सांगत होता. शिवाय दारू पिऊन गणेश याला शिवीगाळ करून अपमान करत होता.

शरदच्या वारंवारच्या त्रासाला कंटाळून गणेश याने आत्महत्या केली. याबाबत शरद याच्यावर गणेशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी शरद याला अटक केली आहे.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.