Chinchwad : दरवाजाचे कुलूप तोडून चिंचवडमध्ये दीड लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना संभाजीनगर, चिंचवड येथे सोमवारी (दि. 9) सकाळी उघडकीस आली. अश्‍विनी स्वप्नील भादिंगरे (वय 27, रा. शुभसाधना निवास, संभाजीनगर, चिंचवड) यांनी मंगळवारी (दि. 10) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 फेब्रुवारी ते 9 मार्च 2020 दरम्यान फिर्यादी अश्‍विनी यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतील 28 ग्रॅम सोन्याचे दागिने, 70 ग्रॅम चांदीचे दागिने, रोख रक्‍कम, लॅपटॉप व एटीएम कार्ड असा एकूण एक लाख 46 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

  • वाकडमधून दोन मोबाईल चोरीस
    खोलीचा पत्रा उचकटून चोरट्यांनी दोन मोबाइल चोरून नेल्याचा प्रकार वाकड येथे मंगळवारी (दि. 10) पहाटे उघडकीस आला. सोनू मनिराम चौधरी (वय 23, रा. कार्टीयार वन बिल्डींग, शनि मंदीर जवळ, वाकड) यांनी मंगळवारी (दि. 10) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहा ते मंगळवारी पहाटे चार वाजताच्या दरम्यान चोरट्यांनी चौधरी यांच्या घराचा पत्रा उचकटून आतील पाच हजार रुपये किंमतीची दोन मोबाईल चोरून नेले. पोलीस नाईक शिंदे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.