Chinchwad : वल्लभनगर एस टी स्टँड जवळून एकाला 4 लाख रुपयांच्या गांजासह अटक

एमपीसी न्यूज – पिंपरीतील वल्लभनगर एस.टी.स्टँड बाहेरून (Chinchwad) एकाला पोलिसांनी 4 लाख रुपयांचा गांजासह अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.12) मध्यरात्री पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.

बायला अनसिंग किराडे (वय 40 रा.धुळे) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रसाद दंगिलवाड यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Ashok Chavan : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा विक्री करीता त्याच्या ताब्यात 4 लाख 29 हजार 450 रुपयांचा 8 किलो 569 ग्रॅम वजनाचा गांजा घेवून आला होता. पोलिसांना याची खबर मिळताच सापळा रचून त्याला अटक करण्यात (Chinchwad) आली. पोलिसांनी गांजा व मोबाईल जप्त केला. त्याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.