Chinchwad : ‘भाईला का मारले’ म्हणत एकाला बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – ‘तू आमच्या भाईला का मारले?’ असे म्हणून चार जणांनी मिळून एका अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री नऊच्या सुमारास चिंचवडगाव येथे घडली.

अभिजीत आबासाहेब मोरे (वय 17, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोन्या गायकवाड, निवास काशीद आणि त्यांचे दोन मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना चिंचवडगाव येथील गुरुकुल आश्रम शाळेच्या मागील बाजूस नदीच्या किनारी घडली. आरोपींनी फिर्यादी यांच्या जवळ येऊन ‘तू आमच्या भाईला का मारले?’ असे म्हणत काठी, लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये फिर्यादी अभिजीत गंभीर जखमी झाले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.