Chinchwad : उसने पैसे परत न केल्याच्या कारणावरून एकास मारहाण

एमपीसी न्यूज – उसने पैसे परत न केल्याच्या तसेच जुन्या भांडणाच्या (Chinchwad)कारणावरून दोघांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 18) दुपारी लिंक रोड, चिंचवड येथे घडली.

सुभाष कापसे, सचिन कापसे (रा. लिंक रोड, चिंचवड) (Chinchwad)अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संतोष मधुकर शिरसाठ (वय 37, रा. लिंकरोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Alandi : आळंदी शहरात जलाराम बाप्पाची मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष हे त्यांच्या मित्रांसोबत लिंकरोडवर गणपती मंदिराजवळ गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तिथे आलेल्या सुभाष कापसे याने संतोष यांना उसने पैसे परत न केल्याच्या व जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ केली.

 

डोक्यात लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. संतोष यांनी आरडाओरडा केला असता सुभाष याचा मुलगा सचिन तिथे बियरची बाटली घेऊन आला. त्याने संतोष यांना शिवीगाळ करून धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.