Chinchwad : ओटीपी विचारून महिलेची सव्वा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – नोकरी डॉट कॉम मध्ये केलेले रजिस्ट्रेशन रद्द झाल्याचे सांगत मोबाईलवर आलेला ओटीपी विचारला. त्याद्वारे महिलेच्या खात्यातून 1 लाख 19 हजार 504 रुपये काढून घेतले. ही घटना 16 जुलै रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास चिंचवड येथे घडली.

स्मिता योगेश कटारिया (वय 38, रा. गावडे कॉलनी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीने स्मिता यांना 8006835348 या क्रमांकावरून फोन केला. नोकरी डॉट कॉम मधून बोलत असल्याचे सांगून ‘तुमची पेड सर्व्हिस काही कारणास्तव अॅक्टिवेट होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही तुमचे पैसे रिफंड करत आहोत’ असे म्हणाला. पैसे रिफंड करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगा, म्हणून ओटीपी माहिती करून घेतला. त्याआधारे आरोपीने स्मिता यांच्या बँक खात्यातून 1 लाख 19 हजार 504 रुपये काढून त्यांची फसवणून केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.