Chinchwad : घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई दळवी नगर चौक येथील बस स्टॉपजवळ मंगळवारी (दि. 15) दुपारी साडेपाचच्या सुमारास करण्यात आली.

लखन उर्फ बबल्या अवधूत शर्मा (वय 19, रा. पांढरकर चाळ, दळवीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई अमोल गुलाब माने यांनी फिर्याद नोंदवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दळवी नगर येथील बस स्टॉप जवळ दोन जण संशयितरित्या उभे असून त्यांच्याजवळ घातक शस्त्र असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यातील तर लखन याच्याजवळ तलवार आढळून आली. त्यावरून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.